कुडाळ : कुडाळ तालुक्यातील श्री. देव रवळनाथाची भूमी म्हणून ओळख असणारे निसर्गरूपी खेडे म्हणजे निरुखे.. याच गावात ग्रामपंचायत आयोजित श्रावण कन्या स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची प्रथम मानकरी कु. रिध्दी प्रसाद तेरसे ठरली. कु. यशस्वी सुधीर सावंत व कु. तन्वी ज्ञानेश्वर सुतार यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. कु. वेदिका वैभव तांबट व कु. सुहानी सुभाष मर्गज यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या कार्यक्रमास जि.प. महिला बालकल्याण सभापती नारकर मॅडम, ओरोस जि प .
सदस्या सुप्रिया वालावलकर, निरुखे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुशील ठाकूर सर व कु. समीक्षा मर्गज यानी केले. या स्पर्धेला सौ. अनिला पालव ग्रामपंचायत अधिकारी निरुखे
श्री संजय घाडीगावकर, सौ. गोसावी मॅडम, कु. ज्योती देवळी परीक्षक म्हणून लाभल्या.
तसेच या स्पर्धेसाठी कु. तुप्ती चव्हाण, कु. सोनाली घाडी श्री. सुनिल परब, श्री. विष्णू तेरसे, श्रीम. धनश्री माळगी, सौ. संस्कृती पालव, सौ. रिया नाईक, सौ. गिता तेरसे, सौ. काव्या तेरसे, सौ. रिद्धी तेरसे, श्री. रामकृष्ण तेरसे, श्री. सत्यवान गुरव व श्री किरण नाईक यांचे सहकार्य लाभले.


Subscribe










