कुडाळ शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त बनवण्याच्या उद्देशाने शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ७:३० वाजता एका विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. “एक दिवस माझ्या कुडाळासाठी…” या संकल्पनेतून ‘स्वच्छ कुडाळ, सुंदर कुडाळ, अभिमान आपला कुडाळ’ असा संदेश देत राज हॉटेल जवळील अंडरपास येथून स्वच्छता मोहिम् होणार आहे.
शहरातील विविध रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.या संदर्भात बोलताना नगरसेवक मंदार शिरसाट म्हणाले, “कुडाळ हे आपले घर आहे आणि ते स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने आणि कार्यकर्त्याने या श्रमदानात आपला खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे.”या मोहिमेमध्ये शहरातील सर्व कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले योगदान द्यावे, असे आवाहन नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.