
मालवण व कुडाळ तालुक्यात आज नारळी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना माजी आमदार,शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शविली. प्रथमतः वैभव नाईक यांनी समुद्राला नारळ अर्पण करत मच्छिमारांचे रक्षण करण्याची व मच्छिमारांची मच्छिमारी व्यवसायात भरभराट व्हावी अशी प्रार्थना केली.
नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आणि बंड्या सरमळकर मित्रमंडळाच्या वतीने महिलांसाठी मालवण जेटी येथे आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक,पत्नी स्नेहा नाईक व माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. तदनंतर लायन्स क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेला आणि कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेला वैभव नाईक यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी प्रमाणे कुडाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित रिक्षा सेनेच्या वतीने रिक्षा रॅली काढण्यात आली. यावेळी मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भंगसाळ नदीत मानाचा नारळ अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उप तालुकाप्रमुख बाळा पावसकर, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, कुडाळ संपर्कप्रमुख अतुल बंगे, गुरू गडकर,अमित राणे, संदीप म्हाडेश्वर, नितीन सावंत, शैलेश काळप,बंड्या कोरगावकर, सचिन ठाकूर, संतोष अडूळकर संदीप कोरगावकर,दीपक सावंत, विनोद शिरसाट,दाजी गावडे,निलेश मातोंडकर, हंसराज सावंत, सतीश कुडाळकर, रुपेश तुळसकर रिक्षा सेनेचे संजय मसुरकर, बाळा वेंगुर्लेकर,नागेश दळवी,दाजी गावडे,प्रवीण पालव,शामा परब आदी उपस्थित होते.
मालवण येथे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, ज्येष्ठ शिवसैनिक,उद्योजक नितीन वाळके, सामाजिक कार्यकर्ते बंड्या सरमळकर,युवासेना तालुका समन्वयक, नगरसेवक मंदार ओरसकर,नगरसेवक तपस्वी मयेकर,नगरसेवक महेंद्र म्हाडगुत,नगरसेविका अनिता गिरकर,नंदिनी नाईक, राजवर्धन नाईक, महेश जावकर, उमेश मांजरेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत,उपतालुकाप्रमुख रश्मी परुळेकर,शहर संघटक राधिका मोंडकर,युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे,रूपा कुडाळकर,गौरी सावंत,स्मिता सरमळकर, माधुरी प्रभू, आकांक्षा शिरपुटे,तृप्ती मयेकर,सोनाली खोबरेकर,संजना रेडकर, युवासेना शहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर, मनोज मोंडकर,अन्वय प्रभू,राहुल सावंत,सुधीर परब,प्रथमेश सरमळकर,बबन वाघ,आर्या गावकर,दिपा जावकर,योगिता गावकर,बाळा मिटकर,अक्षय रेवंडकर, फिलसू फर्नांडिस,सुरेश मर्ये, सूत्रसंचालक रोहन कदम, लारा मयेकर उपस्थित होते.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe









