ओरोस : नारळी पौर्णिमेच्या दिवशी युवक पिट ढवळ नदीपात्रात बुडाला

अंधारामुळे रात्री शोधकार्यात येत होते अडथळे

आज अखेर युवकाचा मृतदेह शोधण्यात यश

सिंधुदुर्गनगरी : नारळी पौर्णिमेच्या आनंदाच्या सणाच्या दिवशी ओरोस परिसरातील पिट ढवळ नदीवरून एक युवक नदीच्या पात्रात पडून वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. विजय जंगले असे त्या युवकाचे नाव आहे. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारळी पौर्णिमेच्या संध्येच्या सुमारास पिट ढवळ नदीच्या पात्रात विजय जंगले हे नारळ वेचण्यासाठी उतरले होते. यावेळी पाय घसरल्यामुळे ते नदीपात्रात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच रात्रीच्या सुमारास पोलीस प्रशासन व इंडियाची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. परंतु अंधारामुळे रात्री शोधकार्य राबवणे अशक्य झाले होते.

आज अखेर युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले. मालवण येथील जय बालाजी रेस्क्यू टीमच्या आणि सिंधुदुर्गनगरी पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांच्या प्रयत्नातून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

सणाच्या आनंदाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेमुळे ओरोस परिसरात शोककळा पसरली असून, मृत युवकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी रेस्क्यू टीमने दाखवलेल्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!