कुडाळ शहरातील खालची कुंभारवाडी येथील ५५ वर्षीय उर्मिला उमेश कुंभार या महिला २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घरातील कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या आहेत. त्यानंतर त्यांचा अद्याप शोध लागलेला नसून, कुडाळ पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.
बेपत्ता महिलेचे नाव उर्मिला उमेश कुंभार, (वय ५५ वर्षे, रा. खालची कुंभारवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे आहे. त्या निळसर रंगाचा किंवा अन्य कोणत्याही रंगाचा गाऊन परिधान केलेल्या असण्याची शक्यता आहे. त्यांच्या गळ्यात काळ्या रंगाचा दोरा असून, त्याला काळ्या छोट्या मण्यांचे खोटे मंगळसूत्र आहे.
सदर महिला कोणाला दिसून आल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी थांबवून तात्काळ कुडाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच त्यांच्या ठावठिकाणाबाबत कोणतीही उपयुक्त माहिती मिळाल्यास विलंब न करता पोलिसांना कळवावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
संपर्क : कुडाळ पोलीस ठाणे (०२३६२-२२२५३३), प्रमोद काळसेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल (८६०५७२४१०५), युगा जळवी (७०५८०७७०५१), सरस्वती कुंभार (८३७८९६५३७४).
बेपत्ता महिलेच्या शोधासाठी नागरिकांनी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन कुडाळ पोलिसांनी केले आहे.


Subscribe










