शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कानाखाली मारली

विद्यार्थ्यांच्या कानाला दुखापत

पालकांची थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

देवगड-निपाणी राज्यमार्गालगत असलेल्या एका हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा कानाखाली शाळेमधील एका शिक्षकांनी मारल्याने त्याच्या कानाला दुखापत झाली. या प्रकारामुक्षे संतप्त पालकानी त्या शिक्षकाच्या विरोधात थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.

याबाबत प्राप्त निवेदनात नमूद केलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच त्या हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यांला अभ्यासाच्या कारणावरून शिक्षकाने कानाखाली मारली.

यामध्ये त्याच्या कानाला दुखापत झाली. संबंधित शिक्षकाने चुकीच्या पद्धतीने मारहाण केल्यामुळे पाल्याचे शारीरिक व शैक्षणिक नुकसान झाल्याच्या आरोप करत पालकांनी याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तोंडी स्वरूपात तक्रारी केली. या प्रकारामुळे मुलाचे शारीरिक नुकसान व भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मुलाच्या पालकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. तसेच शिक्षणाधिकारी यांनाही निवेदन देऊन सखोल चौकशी करावी अन्यथा कुटुंबीयांसमवेत उपोषणला बसण्याचा इशारा मुलाच्या पालकांनी दिला आहे.

error: Content is protected !!