जिल्ह्यात आणखी एक आत्महत्या; जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय?

सावंतवाडी : आरोंदा शिवपुतेवाडी येथील महेश शिवराम कुबल (49) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन सोमवारी सकाळी आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

सावंतवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश कुबल या तरुणाने आपल्याच घराच्या मागे असणाऱ्या घराच्या लोखंडी बाराला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणाला दारुचे व्यसन असल्याचे पोलिसांनी सांगितले, तसेच त्यांची पत्नी ही माहेरी होती असे स्पष्ट केले. त्यातूनच त्याने हे पाऊल उचलले असावे असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सागितले. या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलिस करीत आहेत.

कुडाळचे पोलीस कॉन्स्टेबल सूरज पवार यांच्या आत्महत्येनंतर लगेचच ही घटना घडल्यामुळे जिल्हा नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न पडत आहे.

error: Content is protected !!