एका कॉलवर पेशंटचे ८ लाख रुपये माफ
कोकण आणि राणे कुटुंबीय यांचे एक अतूट असे नाते आहे. कोकण म्हणजे राणे… आणि राणे म्हणजेच कोकण… हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला अवगत आहे. आपल्या कोणत्याही समस्येचं निराकरण राणे कुटुंबीयच करू शकतात हे कोकणी माणसाला पक्कं ठाऊक झालं आहे. त्यात करून आमदार निलेश राणेंचं नाव म्हणजे रामबाण उपाय… याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला.
कुडाळ तालुक्यातील रामचंद्र सत्यवान सावंत (सध्या राहणार विरार) या तरुणाला अचानक अत्यवस्थ वाटू लागल्याने त्याला मीरारोड येथील पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. पुढील ८ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. हॉस्पिटलचे ८ दिवसांचे बिल तब्बल ११ लाख एवढे आले. हे बिल पाहून कुटुंबियांना धक्काच बसला. काय करावं काहीच सुचेना. अशा वेळी त्यांना पहिली आठवण झाली ती आमदार निलेश राणे यांची… त्यांनी युवासेनेचे कुडाळ उपतालुकाप्रमुख बाळा सावंत यांना ही गोष्ट सांगितली. बाळा सावंत यांनी ही बाब आमदार निलेश राणे यांच्या कानावर घातली. राणे मेडिकल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांनी स्वतः पाठपुरावा केला. हॉस्पिटल प्रशासनाशी चर्चा करून तब्बल ८ लाख रुपये माफ केले. यानंतर रामचंद्र सावंत यांच्या कुटुंबीयांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले.
राणे कुटुंबीय कोकणी माणसांसाठी नेहमीच देवदूत ठरले आहेत. आज पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. राणे कुटुंबीय म्हणजे कोकणवासीयांचे आधारवड आहेत ज्यांच्या शीतल छायेखाली कोकणवासीय उभे आहेत. आमदार निलेश राणे म्हणजे कुडाळ – मालवणवासियांना लाभलेले एक अनमोल रत्न आहे. या रत्नाच्या तेजामुळे अवघ्या कोकणचं भविष्य उजळून निघणार आहे एवढं नक्की…














 
	

 Subscribe
Subscribe









