घावनळेच्या अंकिता घावनळकरला उत्कृष्ट भाषाशैली म्हणून पुरस्कार

रील्स स्पर्धेचे करण्यात आले होते आयोजन

निसर्ग सौंदर्याने नटलेलं आपलं कोकण. आपल्या कोकणातील कुडाळ तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं छोटंसं असं गाव म्हणजे आपली माड्याची वाडी. 108 महंत मठाधीश परमपूज्य गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून ह्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची स्थापना करण्यात आली. माड्याच्यावाडीत ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची कृष्णशीला दगडात साकरण्यात आलेल्या नेत्रादीपक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. याच अनुषंगाने आणि प. पु. गावडे काका महाराज ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मठाची पुनर्बंधणी करण्यात आली. ह्यामध्ये रील्स स्पर्धा ठेवण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये घावनळेच्या अंकिता घावनळकरचा उत्कृष्ट भाषाशैलीसाठी गौरव करण्यात आला. तसेच गावडे काका महाराज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

error: Content is protected !!