आशिष पाटील सर दिग्दर्शित सुंदरी

चिमणी पाखरं डान्स एक अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत सेलिब्रिटी कलाकारांचा डान्स शो

कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत सेलिब्रिटी कलाकारांचा डान्स शो प्रथमच आपल्या कुडाळ, सिंधुदुर्गमध्ये सादर होत आहे. या शोमध्ये आपल्याला लावणी किंग, फिल्म इंडस्ट्री कोरियोग्राफर श्री. आशिष पाटील सर दिग्दर्शित सुंदरी हिस्ट्री ऑफ लावणी पाहता येणार आहे.

या शोमध्ये आपल्याला श्री. आशिष पाटील सर यांना लाईव्ह नृत्य करताना पाहण्याची सुवर्णसंधी सोबतच टिम आशिष पाटील सर यांच्या सर्व सुंदरी नृत्यांगणांचा नृत्याविष्कार याची देही याची डोळा पहायला मिळणार आहे.

रविवार दिनांक ११ मे २०२५ रोजी सायं. ७. ०० वाजता हा कार्यक्रम असून सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्थळ : मराठा समाज हॉल, कुडाळ

error: Content is protected !!