सावंतवाडी : एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी ओळख निर्माण करून तिच्या अज्ञानाचा फायदा घेत बसच्या वाहकाने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी सदर संशयीत वाहकास ताब्यात घेतले आहे. अत्याचार करणाऱ्या संशयित वाहकाचे नाव गिरीश अशोक घोरपडे (वय ४०, रा-भेडशी ता.दोडामार्ग ) असे आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत सदर वाहका विरोधात गुन्हा दाखल करून शनिवारी अटक करण्यात आली आहे. संशयित गिरीश घोरपडे हा सावंतवाडी आगारात वाहक म्हणून कार्यरत आहे अशी माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अंमलदार कदम यांनी दिली.