संशयीताला तीन दिवसाची पोलीस कोठडी
सावंतवाडी : पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ताब्यात अटक करण्यात आलेल्या त्या संशयीताला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे, तसे निवेदन त्यांनी पोलिसांना दिले आहे.
तालुक्यातील एका गावात अंगणवाडीत शिकत असलेल्या पाच वर्षाच्या मुलीवर ४५ वर्ष तरुणाने स्वच्छतागृहात जाऊन अत्याचार केला होता. ही घटना दोन दिवसानंतर उघड झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत हा सर्व प्रकार पुढे आला होता. या प्रकरणी काल उशिरा संबंधित संशयिताला अटक करण्यात आली. दरम्यान संबंधित संशयित हा किनारपट्टी परिसरातल्या एका गावातील आहे. तो आपल्या मामाच्या गावाला आला होता. दरम्यान अंगणवाडीच्या परिसरात कोणीच नसल्याची संधी साधून त्याने हा प्रकार केला. तो दारुडा आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्या पत्नीने त्याला यापूर्वी सोडले आहे, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला २१ तारखे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित गावच्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्या नराधमावर कडक कारवाई करा, त्याला सोडू नका, अशी मागणी करण्यात आली आहे, तसे निवेदन त्यांनी सावंतवाडी पोलिसांना दिले आहे.



Subscribe






