सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाच्या निमित्ताने सावंतवाडीत मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत, कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे जि. प. सदस्य मायकल डिसोजा आणि कुडाळ येथील उद्योजक रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत आज प्रवेश करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही फार मोठी राजकीय घडामोड समजली जात असून यामुळे भविष्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत.