कुडाळ : चेंदवण माऊली विद्यालयात विज्ञान जत्रा संपन्न झाली. श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयचेंदवण येथे शनिवार दिनांक 22/03/2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान जत्रा आयोजित करण्यात आली.. यावेळी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध माॅडेल तयार करून उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण केले… या विज्ञान जत्रेचे उद्घाटन शाळा समिती सदस्य संजय नाईक यांनी केले.. यावेळी संस्था खजिनदार श्री अरुण अमरे उपस्थित होते.. तसेच कवठीतील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनिष वाडयेकर, शिक्षक पालवे सर, व कवठी शाळेतील विद्यार्थी हजर होते, तसेच चेंदवण मराठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मसुरकर सर, पाटील मॅडम व पालक वर्ग हजर होते. प्रशालेतील विज्ञान शिक्षिका सौ गवस यांनी या जत्रेचे आयोजन व योग्य प्रकारे नियोजन केले होते त्यांना विद्यालयातील विद्यार्थी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रतीकृती व त्यांचे सादरीकरण अतिशय छानपणे केल्याचे संस्था खजिनदार ,श्री अरुण अमरे ,संस्था सदस्य श्री संजय नाईक तसेच मुख्याध्यापक श्री माणिक पवार यांनी सांगितले. सर्व विद्यार्थी व विज्ञान शिक्षिका सौ.गवस यांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने अभिनंदन केले तसेच पालक व ग्रामस्थ यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले…














 
	

 Subscribe
Subscribe









