पीक विमा मिळाला नसल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करणार
.कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी पंचक्रोशीतील व माणगाव खोऱ्यातील वाडोस मंडळ शेतकऱ्यांनाही अद्यापही पिक विमा मिळाला नाही. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यात शेतकऱ्यांना पिक विमा प्राप्त झाला नाही. अवकाळी पावसामुळे सध्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अशा परिस्थितीत पिंगुळी परिसरातील व वाडोस मंडळ येथील शेतकऱ्यांना अद्यापही पिक विमा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांचे दिवाळी काळी झाली.
त्यामुळे येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना पिक विमा प्राप्त न झाल्यास शेतकरी लोकशाही मार्गाने जन आंदोलन करतील. त्यामुळे कायद्याने सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आपल्या कार्यालयाचे राहील याची नोंद घ्यावी तरी कोणत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पंधरा दिवसात पिक विमा भरपाई मिळावी असे निवेदन कृषी अधिकाऱ्यांना पिंगुळी जिल्हा परिषद मतदार संघाचे विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर तसेच युवा सेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी अमित राणे समन्वयक, गुरु गडकर उपशहर प्रमुख, केतन शिरोडकर तालुका सचिव, सागर बोगटे उपतालुकाप्रमुख, कपिल म्हापसेकर विभाग प्रमुख, अरुण धुरी माझी पोलीस पाटील आनंद कारणे शिवसेना शाखाप्रमुख, अभिजित कारणे, दीपक धुरी, ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पिंगुळकर आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Subscribe









