परप्रांतीय मुसलमान व्यक्तीकडे रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड!
गोळवणवासिय आक्रमक; कारवाईची मागणी
पालकमंत्री नितेश राणे यांचे वेधले लक्ष
मालवण: प्रतिनिधी
भंगार व्यवसायाच्या निमित्ताने परप्रांतीय मुस्लिम धर्माच्या व्यक्तीला गावात राहण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्डसहित मतदानकार्ड ही ई-कागदपत्रे देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मालवण तालुक्यातील गोळवण गावात घडली असून यामुळे चर्चेला उधाण आले आहे. एवढेच नव्हे तर गावातील मुळ नागरिकांना डावलून सदर परप्रांतीय व्यक्तीला अन्नसुरक्षा योजनेचा फायदा मिळत आहे. गोळवण गावातील नागरिकांनी या प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच सदर व्यक्ती रोहिंग्या मुसलमान असल्याचा ग्रामस्थांना संशय आहे. परप्रांतीय मुस्लिम व्यक्तीला कागदपत्रे देवून गोळवणचा नागरिक बनवून देणाऱ्या वरदहस्त कोणाचा हा प्रश्न समोर येत आहे.
मालवण तालुक्यातील गोळवणमध्ये एक परप्रांतीय मुसलमान व्यक्ती असून त्याला सरकारी सर्व सवलती मिळत असल्याचे समोर येत आहे. सदर व्यक्तीला
गावातून बाहेर काढा अशी मागणी होत असून या गावात कधीही वातावरण पेटण्याची शक्यता आहे.
तसेच या परप्रांतीय मुस्लिम व्यक्तीस कागदपत्रे बनवून देणाऱ्यांवर पालकमंत्री नितेश राणे यांनी कारवाई करावी अशी मागणी गोळवण ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत कारवाई न झाल्यास लवकरच जनआंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा देखील देण्यात आला आहे.













