वैभववाडी : येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी करिअर कट्टा विभाग आणि युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग व साद फौंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ फेब्रुवारी रोजी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व श्री.तुकाराम जाधव, संचालक द युनिक अकॅडमी पुणे यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच या कार्यक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादन केलेल्या यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे.
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये कोकणातील विद्यार्थी मागे न राहता सर्वांसोबत स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्येही अग्रेसर राहावा, यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयामध्ये करिअर कट्टा विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत स्पर्धा परीक्षा, उद्योजकता विकास व कौशल्य विकास यावर भर दिला जातो. करिअर कट्टा विभागामार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दि.११ फेब्रुवारी,२०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केलेले आहे. या कार्यक्रमासाठी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे पदाधिकारी तसेच स्थानिक समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच युनिक अकॅडमीच्या यशवंत विद्यार्थिनी व प्रशासकीय अधिकारी कुडाळ गीतांजली नाईक आणि युनिक अकॅडमी सिंधुदुर्गचे मार्गदर्शक श्री. सचिन कोर्लेकर उपस्थित राहणार आहेत.या व्याख्यानाचा वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. अजित दिघे 8087555465/ 9689414974 यांच्याशी संपर्क साधावा.













