५०० रुपये द्या आणि १०वीचे गुण वाढवा

कोल्हापूर मधे काही शाळांमधे बोर्डाच्या नियमांचा गैरवापर

कोल्हापूर: दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून विविध लोककला, चित्रकला, आणि काही इतरही उल्लेखनीय कामगिरीबद्दल अतिरिक्त १० गुण दिले जातात. बोर्डाच्या या नियमाचा गैरवापर कोल्हापूर मधे होत असल्याची बाब समोर आली आहे.एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहिती नुसार कोल्हापुरात ५०० रुपये देऊन १०वीच्या बोर्डाच्या परीक्षेत १० गुण वाढवून देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासाठी बोगस प्रमाणपत्र विकल्याची माहिती आता समोर आली आहे. कोल्हापूरमधील काही शाळांकडून बोर्डाच्या या सवलतीचा गैरवापर करण्यात आला आहे.५०० रुपये द्या आणि १० वीचे १० गुण वाढवून घ्या असा गैरप्रकार सध्या कोल्हापुरात सुरू आहे. दहावीच्या बोर्डाने दिलेल्या सुविधेचा गैरफायदा कोल्हापुरातील काही शाळांकडून घेतला जात असल्याचं समोर आला आहे.

आता खासगी अंगणवाड्या येणार सरकारच्या नियंत्रणाखाली

विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ही सवलत असते. स्पोर्ट किंवा इतर अॅक्टीव्हिटीमध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढवा १० गुण दिले जातात. १० गुण मिळवण्यासाठी हे प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतं. दरम्यान, कोल्हापुरात विद्यार्थ्यांकडे कोणतेही कलागुण नसताना हे प्रमाणपत्र दिलं जात आहे. गेल्यावर्षी ५० हजार विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुणाचे प्रस्ताव बोर्डाने फेटाळले होते. यात २३ हजार प्रस्ताव एकट्या कोल्हापूर मधले होते.

error: Content is protected !!