शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथील इयत्ता दहावीच्या ४४ विद्यार्थ्यांना “आयडियल स्टडी अॅप”चे वितरण
रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांचा संयुक्त उपक्रम
रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथील इयत्ता दहावीच्या ४४ विद्यार्थ्यांना “आयडियल स्टडी अॅप”चे वितरण करण्यात आले.
डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक सक्षम साधन उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. या अॅपचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, अधिक चांगले गुण मिळवावेत आणि उज्ज्वल भविष्यासाठी आत्मविश्वासाने वाटचाल करावी, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांनी केले.
या प्रसंगी रो. नीता गोवेकर मॅडम, संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकुंद धुरी साहेब, प्रशालेचे मुख्याध्यापक तकीलदार सर, नार्वेकर सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक विद्यार्थी सक्षम झाला, तर एक कुटुंब सक्षम होते; आणि शिक्षणाची संधी मिळाली, तर संपूर्ण समाजाची दिशा बदलू शकते.
सेवा केवळ मदत करण्यापुरती मर्यादित नसून, भविष्यातील पिढी घडविण्याचे माध्यम आहे.
रोटरीच्या “Service Above Self” या विचारातून साकारलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल आहे.
🌱 चला, शिक्षणाला डिजिटल बळ देऊया…
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देऊया…
आणि सक्षम समाज घडवूया! 🇮🇳


Subscribe










