कुडाळमधील मुले ‘क्लास १ ऑफिसर’ व्हावीत यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांचे आश्वासक पाऊल

कुडाळ शहरात मुंबई विद्यापीठाचे एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र होण्यासाठी सिनेट सदस्याच्या माध्यमातून घेणार कुलगुरुंची भेट

मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्यांच्या दौऱ्या दरम्यान नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी विविध मागण्या व समस्या सिनेट सदस्य यांच्या समोर मांडल्या होत्या .

कुडाळ शहरात मुंबई विद्यापीठाचे ‘MPSC/UPSC उपकेंद्र’ सुरू करण्यासाठी सिनेट सदस्यांच्या माध्यमातून कुलगुरुंची भेट व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, विशेषतः कुडाळ परिसरातील ग्रामीण व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे उच्च दर्जाचे मार्गदर्शन मिळून कुडाळमधील जास्तीत जास्त मुले ‘क्लास १ ऑफिसर’ (Class 1 Officer) व्हावीत, या मुख्य उद्देशाने कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी अत्यंत आश्वासक पाऊल उचलले आहे. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात आयोजित मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांच्या विशेष संवाद कार्यक्रमात नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सिनेट सदस्यांचे लक्ष वेधले असून, यासंदर्भात थेट मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी वेळ मिळवण्याची विनंती केली होती.

त्याला सिनेट सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व ऑक्टोबर मध्ये भेटीचे तत्काळ नियोजन देखील केले.

कुडाळच्या मातीतून वर्ग-१ चे अधिकारी घडवण्याचा संकल्पया प्रसंगी बोलताना नगरसेवक मंदार शिरसाट म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता, क्षमता आणि कष्ट करण्याची तयारी आहे. मात्र, जिल्ह्यात सुसज्ज स्पर्धा परीक्षा केंद्र आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचे पॅनेल उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने पुणे, मुंबई किंवा कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करावे लागतात. गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांना हा आर्थिक खर्च परवडत नाही. आमचा मुख्य उद्देश हाच आहे की, कुडाळ आणि आसपासच्या ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मुला-मुलींनी राज्यसेवा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘क्लास १ अधिकारी’ (उदा. उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, आयएएस, आयपीएस) व्हावे. यासाठी मुंबई विद्यापीठाचे अधिकृत केंद्र कुडाळमध्ये आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”सिनेट सदस्यांच्या उपस्थितीत मांडले तांत्रिक मुद्देकुडाळ येथील महाविद्यालयात झालेल्या या संवाद कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचाडे, ॲड. अल्पेश भोईर, नेहा गवळी, मयूर पांचाळ यांनी तात्कळ दखल घेतल्याचे दिसून आले.

कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असून रेल्वे व बस वाहतुकीने उत्तम जोडलेले आहे, त्यामुळे मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि कणकवली तालुक्यातील विद्यार्थ्यांनाही याचा थेट फायदा होईल, ही भौगोलिक बाजू त्यांनी सिनेट सदस्यांसमोर लावून धरली. तसेच, कुडाळमध्ये स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधा आणि जागा उपलब्ध करून देण्याबाबतही विद्यापीठाला पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

कुलगुरूंच्या आगामी भेटीसाठी जोरदार तयारी
मंदार शिरसाट यआश्वासक भूमिकेची दखल घेत उपस्थित सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत (Vice-Chancellor) तातडीने बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे. या आगामी भेटीदरम्यान कुडाळमधील विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन, सविस्तर प्रस्ताव आणि संपूर्ण आराखडा कुलगुरूंना सादर केला जाईल. मंदार शिरसाट यांच्या या महत्त्वाच्या पुढाकारामुळे सिंधुदुर्गातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आशेचे अत्यंत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
कुडाळमधील मुले ‘क्लास १ ऑफिसर’ व्हावीत यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांचे आश्वासक पाऊल;

मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्यांच्या दौऱ्या दरम्यान नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी विविध मागण्या व समस्या सिनेट सदस्य यांच्या समोर मांडल्या होत्या .

कुडाळ शहरात मुंबई विद्यापीठाचे ‘MPSC/UPSC उपकेंद्र’ सुरू करण्यासाठी सिनेट सदस्यांच्या माध्यमातून कुलगुरुंची भेट व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, विशेषतः कुडाळ परिसरातील ग्रामीण व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे उच्च दर्जाचे मार्गदर्शन मिळून कुडाळमधील जास्तीत जास्त मुले ‘क्लास १ ऑफिसर’ (Class 1 Officer) व्हावीत, या मुख्य उद्देशाने कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी अत्यंत आश्वासक पाऊल उचलले आहे. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात आयोजित मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांच्या विशेष संवाद कार्यक्रमात नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सिनेट सदस्यांचे लक्ष वेधले असून, यासंदर्भात थेट मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी वेळ मिळवण्याची विनंती केली होती.

त्याला सिनेट सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व ऑक्टोबर मध्ये भेटीचे तत्काळ नियोजन देखील केले.

कुडाळच्या मातीतून वर्ग-१ चे अधिकारी घडवण्याचा संकल्पया प्रसंगी बोलताना नगरसेवक मंदार शिरसाट म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता, क्षमता आणि कष्ट करण्याची तयारी आहे. मात्र, जिल्ह्यात सुसज्ज स्पर्धा परीक्षा केंद्र आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचे पॅनेल उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने पुणे, मुंबई किंवा कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करावे लागतात. गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांना हा आर्थिक खर्च परवडत नाही. आमचा मुख्य उद्देश हाच आहे की, कुडाळ आणि आसपासच्या ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मुला-मुलींनी राज्यसेवा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘क्लास १ अधिकारी’ (उदा. उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, आयएएस, आयपीएस) व्हावे. यासाठी मुंबई विद्यापीठाचे अधिकृत केंद्र कुडाळमध्ये आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”सिनेट सदस्यांच्या उपस्थितीत मांडले तांत्रिक मुद्देकुडाळ येथील महाविद्यालयात झालेल्या या संवाद कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचाडे, ॲड. अल्पेश भोईर, नेहा गवळी, मयूर पांचाळ यांनी तात्कळ दखल घेतल्याचे दिसून आले.

कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असून रेल्वे व बस वाहतुकीने उत्तम जोडलेले आहे, त्यामुळे मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि कणकवली तालुक्यातील विद्यार्थ्यांनाही याचा थेट फायदा होईल, ही भौगोलिक बाजू त्यांनी सिनेट सदस्यांसमोर लावून धरली. तसेच, कुडाळमध्ये स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधा आणि जागा उपलब्ध करून देण्याबाबतही विद्यापीठाला पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
कुलगुरूंच्या आगामी भेटीसाठी जोरदार तयारी
मंदार शिरसाट यआश्वासक भूमिकेची दखल घेत उपस्थित सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत (Vice-Chancellor) तातडीने बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे. या आगामी भेटीदरम्यान कुडाळमधील विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन, सविस्तर प्रस्ताव आणि संपूर्ण आराखडा कुलगुरूंना सादर केला जाईल. मंदार शिरसाट यांच्या या महत्त्वाच्या पुढाकारामुळे सिंधुदुर्गातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आशेचे वातावरण आहे

स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, आत्मविश्वास कसा वाढवावा आणि करिअरच्या विविध संधी कशा निवडाव्यात, यासाठी मंदार शिरसाट यांनी यापूर्वी विविध अभ्यासपूर्ण सेशन्स आणि तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे यशस्वी आयोजन केले होते. या मार्गदर्शन शिबिरांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या सेशन्सच्या अनुभवातूनच कुडाळमध्ये कायमस्वरूपी शासकीय स्पर्धा परीक्षा केंद्र असणे किती गरजेचे आहे, हे ओळखून मंदार शिरसाट यांनी आता विद्यापीठ पातळीवर हा लढा सुरू केला आहे.

error: Content is protected !!