रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांचा संयुक्त उपक्रम
कुडाळ : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या संयुक्त विद्यमाने श्री लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली या विद्यालयातील इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या 50 मुलांसाठी आयडियल स्टडी ॲपचे वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष रो.श्री मकरंद नाईक, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी चे सचिव रो निखिल आपटे, इव्हेंट चेअरमन रो.अलंकार तायशेटे, झोनल को-ऑर्डिनेटर वर्षा बांदेकर मॅडम, गव्हर्नर एरिया एड सौ. नीता गोवेकर मॅडम, रो. श्री प्रमोद भोगटे, ॲपच्या डेव्हलपर सौ वंदना कामात मॅडम,प्रशाले तर्फे सहाय्यक शिक्षिका इनरव्हीलच्या सदस्या सौ मनाली नाईक श्री अनिल वारंग सर इतर शिक्षक कर्मचारी व इयत्ता दहावीतील विद्यार्थी उपस्थित होते सदर ॲप चा वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेमध्ये वाढ करावी आणि खूप चांगले गुण मिळवून खूप चांगले नागरिक बनावे अशी अपेक्षा श्री. मकरंद नाईक यांनी व्यक्त केली. तसेच सदरचे ॲप रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी मार्फत देण्यात आले त्यांचे आभार व्यक्त केले.


Subscribe










