आजगाव येथे डंपर पलटी होऊन ड्रायव्हरचा मृत्यू

संदीप कृष्णाजी याच्या अपघाती मृत्यूने रेडी गावावर पसरली शोककळा

वेंगुर्ले : आजगाव सावरदेववाडी सावंतवाडी मुख्य रस्त्यावर आज सोमवारी दुपारी सव्वादोन वा. सुमारास शिरोडा आजगावमार्गे साटेली येथे जात असलेला डंपर पलटी होऊन त्यात डंपर चालक संदीप सखाराम कृष्णाजी (वय 30 – रा.रेडी नागोळेवाडी) याचा मृत्यू झाला. या अपघाताची वेंगुर्ले पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.

रेडी येथील डंपर मालक अजित ज्ञानेश्वर कांबळी यांच्या मालकीचा डंपर क्र.एमएच – ०७ – सी – ५१६५ चालक संदीप सखाराम कृष्णाजी हा रेडी येथून साटेली येथे जात असताना अचानक त्याचा डंपरवरील ताबा सुटून डंपर पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला. यावेळी सदर डंपर रस्त्याच्या कडेला डाव्या साईडला मातीच्या ढिगाऱ्यावर दगडाच्या कठड्यावर चढून पलटी झाला .यात ड्रायव्हर डंपरच्या केबिनखाली सापडून मयत झाला. स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित धाव घेत त्याला खाजगी अँब्युलन्सने शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले , यावेळी डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनसाठी रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आला होता. या अपघाताची माहिती मिळताच वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात सहकार्य केले. घटनेची खबर राघोबा कृष्णाजी यांनी पोलिस स्थानकात दिली आहे. या घटनेबाबत पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पीएसआय तुकाराम जाधव हे करीत आहेत.

error: Content is protected !!