वेंगुर्ले तालुक्यातील कालवी तिठा ते कालवीबंदर या मुख्य रस्त्यावरील पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे

पत्रकार आबा खवणेकर यांची जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्याकडे मागणी

बांधकाम सभापतींनी संबधित अधिकाऱ्यांना धरले धारेवर

सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत आदुर्ले व ग्रामपंचायत केळूस हद्दीतील कालवी तिठा ते कालवीबंदर या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाल्याने पत्रकार आबा खवणेकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांची भेट घेऊन आज सोमवारी तातडीने कालवीबंदर रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजविण्यात यावे,अशी मागणी करीत येत्या १५ दिवसांत या रस्त्यावरील खड्डे बुजविले नाही तर उपोषण करणार असल्याचे श्री.खवणेकर यांनी बांधकाम सभापती श्री.साटविलकर यांना सांगितले.यावेळी माणगाव जिल्हा परिषदेचे सदस्य श्री.रूपेश कानडे हे उपस्थित होते.

गेली दोन वर्षांपासून या कालवी तिठा ते कालवीबंदर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.तसेच सदर रस्ता हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.तसेच येत्या सप्टेंबर मध्ये १४ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी हा मोठा उत्सव येत आहे.गणपतीच्या मूर्त्या काही गणेश भक्त डोक्यावरून तसेच टेम्पोतून नेणार आहेत.पडलेल्या या खड्ड्यांमुळे त्यांना मोठा त्रास होऊ शकतो.तसेच कालवी तिठा ते कालवीबंदर हा रस्ता कालवीबंदर समुद्रकिनारपट्टीवर जाण्यासाठी याच रस्त्यावरुन जावे लागते. येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांसह रिक्षा, टुव्हिलर आदी वाहनांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे.असे पत्रकार आबा खवणेकर यांनी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांना याबाबत माहिती दिली.

यावेळी बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी संबधित अधिकारी सुहास टेमकर व अधिकारी श्री.म्हाडेश्वर यांच्याशी तातडीने फोनवर संपर्क साधून कालवी तिठा ते कालवीबंदर रस्त्यावरील पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश यावेळी सभापती साटविलकर यांनी दिले.तसेच तुम्ही उपोषण करू नका असे श्री.खवणेकर यांना सांगितले. दरम्यान येत्या १५ दिवसांत खड्डे बुजविले नाही तर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल.असे खवणेकर यांनी श्री.साटविलकर यांना सांगितले.

error: Content is protected !!