मनसे वेंगुर्ला शहरचे डॉ.अभि वनकुद्रे यांच्या माध्यमातून मोचेमाड शाळेमध्ये वॉटर बॉटलचे वाटप.
वेंगुर्ला : तालुक्यातील सरस्वती विद्यालय आरवली टाकपूर्ण प्राथमिक शाळा रेडी नंबर 1,पूर्ण प्राथमिक शाळा शिरोडा नंबर 1 तसेच पुर्ण प्राथमिक शाळा मोचेमाड त्याचप्रमाणे श्रीराम वाडी कोचरा या गावांतील मराठी माध्यमिक शाळांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगाव विधानसभेचे सचिव श्री धनश्याम परब यांच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात आल्या. सदर वह्या वाटप प्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष सनी उर्फ गोपाळ बागकर, उपतालुध्यक्ष महादेव तांडेल, महाराष्ट्र सैनिक वेंगुर्ला शहर डॉ.अभि वनकुद्रे, विभाग अध्यक्ष प्रमोद गावडे, विनायक फटनाईक व राजन सारंग, महाराष्ट्र सैनिक सनी राणे, मंदार चोपडेकर सोबत पालक आणि शिक्षक वृंद आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.