मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांच्या “त्या”उमेदवारी मागे सांगितलं नेमक कारण
ब्युरो न्यूज: विधानसभा निवडणूक बिगुल वाजल्यापासूनच महाराष्ट्रात राजकीय वर्तुळातील एकंदरीत वातावरण पाहून ही निवडणूक वादळी होणार आहे यात शंका नाही. दरम्यान सद्ध्या चर्चा आहे ती माहीम मधील तिहेरी चुरशीची. माहीम मधून मनसे चे अमित ठाकरे यांनी उदेमवरी अर्ज भरल्यानंतर भाजपा ने आणि एकूणच महायुती ने पाठिंबा देणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपला पाठिंबा असल्याचं वक्तव्य केलं आहे,मात्र शिवसेनेचे उमदेवार सदा सरवणकर यांनी माहीम मधून अमित ठाकरे यांच्या विरोधात अर्ज केला आहे. आणि ते ही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. या सर्व गोष्टींमुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे ,एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला पाठिंबा असल्याचं सांगत आहेत मात्र दुसरीकडे त्यांच्या पक्षातील सदा सरवणकर यांनी आपला अर्ज भरला असून ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.त्यामुळे मनसे आणि ठाकरे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
दरम्यान या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मत मांडलं आहे. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढवणार असल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत आमच्यासोबत होते, त्यांनी लोकसभा निवडणुकीला आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांची रणनीती काय आहे याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केली होती, तेव्हा ते म्हणाले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप तुम्ही लढा, त्यानंतर आपण बोलूयात. मात्र, त्यानंतर त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले. माहीममधून आमचे गेल्या ३ ते ४ टर्म पासून आमदार आहे, ते आमचे जुने कार्यकर्ते आहेत. ते तिथले आमदार आहेत, त्यांच्याशी देखील मी चर्चा केली.
माहीम मधील कार्यकर्ते आक्रमक
यावेळी ते पुढे म्हणाले,माहिममधील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक आहेत. त्यांना निवडणूक लढायची आहे. कार्यकर्त्यांतकडे देखील आम्हाला लक्ष द्यावं लागेल. कार्यकर्त्यांचे मनोबल खचून जाता कामा नये. ते देखील त्या पक्षाच्या नेत्यांचं काम आहे. त्या दिवसापासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती आहे, त्यात अंतर्गत आम्ही निवडणूक लढत आहोत, आमच्यासोबत रामदास आठवले आहेत, जन सुराज्य पक्ष आहे, आम्ही निवडणूक लढवू आणि जिंकू. आम्ही बहुमताने जिंकू असा विश्वास देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते.
अरविंद सावंत यांच्या त्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका













