देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे आज श्रावणी सोमवारचा दुसरा सोमवार (दिनांक ०४ ऑगस्ट २०२५) भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या शुभ दिवशी पहाटेची पहिली पूजा शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्याहस्ते संपन्न झाली.
या पावन प्रसंगी संजय आंग्रे यांनी सहकुटुंब श्री कुणकेश्वर देवाचे दर्शन घेतले व मनोभावे पूजा केली. या पूजेस सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक आयपीएस श्री. मोहन दहिकर साहेब यांनी देखील उपस्थित राहून श्रींची पूजा केली.
पूजेस उपस्थित मान्यवरांमध्ये देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. तेली, समिती पदाधिकारी, मानकरी ग्रामस्थ यांच्यासह अमित रावराणे, अक्षय जाधव, हर्षद खरात, सुस्मित घाग व संजय आंग्रे यांचे कुटुंबीय यांचा भावपूर्ण सहभाग होता.
या पावन दिवशी श्री कुणकेश्वर देवाच्या चरणी कोकणवासीयांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.