आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली नियुक्ती
कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपले काम पक्ष हितासाठी करा आपला पक्ष वाढला पाहिजे आपल्या मित्र पक्षाला त्रास होईल असे कोणतेही वर्तन करू नका असे आमदार निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.
कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यासाठी कुडाळ एमआयडीसी येथे बैठकीचे आयोजन केले होते यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, संजय पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, माजी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, कुडाळ प्रमुख विनायक राणे, ओरोस प्रमुख दीपक नारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, या नियुक्त्या पक्ष वाढीसाठी दिला जात आहेत आपल्या पक्षाची ध्येय धोरणे आणि करत असलेले काम लोकांपर्यंत घेऊन जाण्याची तुमची जबाबदारी आहे तसेच आपल्या मित्र पक्षांना कोणतेही प्रकारचा त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये उपतालुका प्रमुख हेमंत उर्फ राजन भगत, मिलिंद नाईक, दिनेश वारंग, वेताळ बांबर्डे विभागप्रमुख नागेश आईर, उपविभाग प्रमुख निलेश बांबर्डेकर, पिंगुळी विभागप्रमुख दिलीप निचम, साळगांव उपविभाग प्रमुख मंगेश चव्हाण, पावशी विभागप्रमुख नागेश परब, उपविभाग प्रमुख सुरेश तानावडे, डिगस उपविभाग प्रमुख गजानन कुलकर्णी, माणगांव उपविभाग प्रमुख अविनाश राणे, माणगांव विभागप्रमुख सचिन धूरी, झाराप उपविभागप्रमुख प्रविण रेडकर, घावनळे विभागप्रमुख दिनेश शिंदे, घावनळे उपविभागप्रमुख जयराम सुद्रीक, गोठोसउपविभाग प्रमुख सूरज कदम, कुडाळ तालुका संघटन प्रमुख विठ्ठल जानु शिंदे, माणगांव शहर प्रमुख दत्ता कोरगांवकर, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, सत्यवान हरमलकर, अरविंद परब, ओरोस विभाग प्रमुख परशुराम परब, ओरोस उपविभाग प्रमुख प्रकाश देसाई, कसाल विभाग प्रमुख बापू पाताडे, नेरुर विभाग प्रमुख भास्कर नाईक, वालावल उपविभाग प्रमुख मनीष वाडयेकर, नेरुर उपविभाग प्रमुख सचिन नेरुरकर, आंब्रड विभाग प्रमुख विठ्ठल तेली, आंब्रड उपविभाग प्रमुख प्रशांत तावडे, घोटगे उपविभाग प्रमुख सचिन तेली, तेंडोली विभाग प्रमुख सचिन गावडे, तेंडोली उपविभाग प्रमुख रामचंद्र राऊळ, पाट उपविभाग प्रमुख सदगुरु माधव, चंद्रकांत राणे, पुंडलिक जोशी, बाळा गुरव, गुणवंत सावंत, महिला सेना पदाधिकाऱ्यांमध्ये उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, जिल्हा संघटक अंजना सामंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य रचना नेरुरकर, जिल्हा सचिव आशा वळप्पी, जिल्हा सहसचिव कविता मोंडकर, कुडाळ तालुका प्रमुख वैशाली पावसकर, उपतालुकाप्रमुख वैष्णवी शिंदे, संगीता खांडेकर, तालुका सचिव नूतन आईर, रेवती राणे, कुडाळ शहर प्रमुख श्रुती वर्दम, तालुका समन्वयक अनघा रांगणेकर, दीक्षा सावंत, कार्यकारणी सदस्य अनुप्रीती खोचरे, विभाग प्रमुखमध्ये आंब्रड चैताली ढवळ, ओरोस सितांजली तळवडेकर, वेताळ बांबर्डे शुभांगी चव्हाण, तेंडोली योगेश्वरी कोरगावकर, पावशी मृणाल परब, घावनळे साक्षी लाड, माणगाव दीक्षा आकेरकर विभागीय सदस्य नाजुका धुरी यांची निवड करण्यात आली.