अरविंद सावंत यांनी मागितली शायना एन. सी यांची जाहीर माफी

मुंबई प्रतिनिधी: अरविंद सावंत यांनी शायना एन सी यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान आता खासदार अरविंद सावंत यांनी या अवमानकारक वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे.

काय म्हणाले अरविंद सावंत?

मी महिलांचा कधीहीअपमान केला नाही आणि करणारही नाही. माझ्या वक्तव्यामुळं जर कोणाच्या भावना दुखव असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलं. २९ तारखेला मी जे काही बोललो आहे, त्यानंतर १तारखेला अनेक भगिनी या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि माझ्या वर गुन्हा दाखल झाल्याचे सावंत म्हणाले. अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य केलं होतं. याबाबत त्यांनी माफी मागितली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलाय महाराष्ट्राचा धसका: शरद पवार

error: Content is protected !!