कुडाळ : शिवसेनेच्या कुडाळ उपतालुकाप्रमुखपदी घावनळेच्या दिनेश वारंग यांची नियुक्ती करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेची नूतन कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली. यावेळी आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान आले. ते घावनळे गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते,जिल्हा सरचिटणीस दादा साईल, तालुकाप्रमुख दीपक नारकर, माजी महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर, संजय पडते शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.