परशुराम उपरकरांचे नाचता येईना अंगण वाकडे अशी गत..

परशुराम उपरकर हे सेटलमेंट किंग म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत त्यांनी नको त्या फंदात पडू नये…

शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल यांचा उपरोधिक सल्ला…

सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवणचे सन्मानीय आमदार निलेश राणे यांनी मागील अधिवेशनात केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिल्लक उबाठा पक्षाचे नेते सध्या सैरभैर झाले असून परशुराम उपरकर यांना आता अकलेचे दिवे पाजळण्यासाठी नवीन धुमारे फुटत आहेत. त्यामुळेच उबाठा सेनेतील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग येथील उबाठा पदाधिकाऱ्यांनी त्यांना नुकताच घरचा आहेर दिला आहे. परशुराम उपरकर यांच्या सेटलमेंट कर्तृत्वांमुळे त्यांना त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात येण्याची बंदी घातली आहे. त्यामुळे त्यांना आता काही काम उरले नसून ते आपल्या अकलेचे दिवे पाजळत आहेत अशी टीका शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल यांनी केली आहे.

आत्ताच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात कुडाळ मालवणचे आमदार सन्माननीय निलेश राणे यांनी संपूर्ण कोकणवासींना दिलासा देणारे अनेक विषय विधानसभेत अतिशय अभ्यासपूर्ण रित्या मांडले असून राज्य सरकारने देखील त्याची तात्काळ दखल घेत संबंधित मंत्रालयाने या सर्व विषयांच्या बैठका आयोजित करून आवश्यक त्या पूर्तता करण्याची सुरवात देखील झाली आहे.
कुडाळ मालवण मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून जनतेचे अनेक प्रश्न, समस्या सुटल्या नव्हत्या त्यावेळचे तत्कालीन आमदार त्यावेळीही सत्ताधारी पक्षात असूनही प्रश्न, समस्या सोडविल्या नाहीत…
मुळात विधिमंडळ अधिवेशन ही जनतेचे प्रश्न सभागृहात सोडवण्यासाठी बोलावली जातात. याची जाणीव सहा वर्षे विधान परिषदेचे आमदार राहुन देखील परशुराम उपरकर यांना नाही याचेच नवल वाटते.

अधिवेशनात मुख्यमंत्र्यांपासून सर्व खात्याचे संबंधित मंत्री उपस्थित असतात त्यामुळे विविध संसदीय आयुधे वापरून आमदार मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधातील असोत प्रत्येक जण आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडून ते सोडवत असतो…
उबाठाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात घाई गडबडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न लोकांना दाखविण्यात आले. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्याने मंजूर झालेल्या या वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था भीक नको पण कुत्रा आवर अशीच झाली होती. अधिवेशन काळात आमदार निलेश राणे यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उठवताच तातडीने महत्त्वाची अनेक पदे २४ तासाच्या आत भरली गेली हे उपरकरांना दिसले नाही का?
पावसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा बेभरवशी असते. मागील दहा वर्षांत तर तत्कालीन आमदारानी त्याकडे कानाडोळा केलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी “रोज मरे त्याला कोण रडे” या म्हणीप्रमाणे ‘देवाक काळजी’ म्हणण्याची सवय लावली होती. परंतु लोकांची हीच समस्या आमदार निलेश राणे यांनी विधिमंडळात मांडली. गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्युत विभागाला स्वतंत्र चीफ इंजिनीयर नाही त्यामुळे जिल्ह्यात विद्युत यंत्रणा कोलमडून पडली ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. निष्काळजी आणि निष्क्रीय अधिकारी यांच्यामुळे कुडाळ मालवणच्या जनतेला भोगावा लागणारा मनस्ताप त्यांनी सभागृहात मांडला. यावर संबंधित मंत्र्यांनी अधिवेशन काळात जिल्यातील संबंधित अधिकारी यांची तातडीने बैठक घेऊन तो प्रश्न कायमस्वरुपी तडीस नेला.
हे आणि अनेक असे प्रश्न ज्याप्रमाणे फळ बागायतदारांना जर नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाईचे फळ पिक विमा अंतर्गत जर त्याचे पैसे जमा झाले नसतील तर त्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडून जर आमदार निलेश राणे जर हा प्रश्न सोडवत असतील तर त्यात सरकार अडचणीत येते कुठे?
महायुतीचे सरकार हे जनतेनेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून आणलेले आहे.
आमदार निलेश राणे हे कुडाळ मालवणचे आमदार झाल्यापासून जलदगतीने अनेक विकासकामे मतदारसंघात होत आहेत. मतदारसंघातील विद्युत, कृषी, वैद्यकीय, शिक्षण, रोजगार, रस्ते, पाणि संबंधित प्रश्न सोडवत आहेत.

कुडाळ तालुक्यातील १०० बेड चे जिल्हा महिला, बाल रुग्णालय २०२० पासून कार्यान्वित झालं होते त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीच सरकार होते आणि उबाठा गटाचे आमदार होते परंतु त्या कार्यकाळात या रुग्णालयातील अनेक पद रिक्त होती, रुग्णांना सुविधा उपलब्ध नव्हत्या परंतु निलेश राणे कुडाळ मालवणचे आमदार झाल्यापासून ९०% पदे भरली गेलीत. अत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध झाली, डायलिसिस मशीन कार्यान्वित करण्यात आली अशी अनेक कामे मागील आमदारांच्या कार्यकाळात का झाली नाहीत याबद्दल खरंतर परशुराम उपरकरांनी माजी आमदारांची कानउघडणी करायला हवी होती.

त्यामुळे उपरकरानी निलेश राणे यांच्या मंत्रिपदाची चिंता करू नये कारण राणे कधी मंत्रिपदाच्या मागे धावले नाहीत तर ती त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळविली.
परशुराम उपरकर यांचे पक्षातील सहकारी असलेले वैभव नाईक हे गेले १० वर्ष सत्तेत आणि विरोधी पक्ष असताना पण आमदार होते त्यानी किती वेळा मतदारसंघातील प्रश्न मांडून सरकारला जाब विचारला याची चौकशी करावी.

आमदार निलेश राणे यांच्यामुळे कुडाळ मालवण मतदारसंघाच आवाज १० वर्षानतंर विधानसभेत घुमू लागला आणि मांडलेल्या सर्व विषयांना आता वाचा फुटू लागल्याने परशुराम उपरकर यांना पोटशूळ उठला आहे. त्यांनी त्यांच्या विधान परिषदेच्या सहा वर्षाच्या कारकिर्दीत किती प्रश्न मांडले आणि काय दिवे लावले हे एकदा जनतेसमोर मांडावे आणि मगच आमदार निलेश राणे यांच्या टीका करण्याचे धाडस दाखवावे अशी टीका शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल यांनी केली आहे.

error: Content is protected !!