उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेना, युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

जिल्हा महिला बाल रुग्णालय येथे रुग्णांना केले फळांचे वाटप

      शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या  वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेना आणि युवासेना  यांच्या वतीने कुडाळ येथील जिल्हा महिला बाल रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच कुडाळ शिवसेना शाखा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिरात ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

   यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्रेया परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष अतुल बंगे, तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे,युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, शहर प्रमुख संतोष शिरसाट, शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, उपशहर प्रमुख गुरू गडकर,युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर , विनय पालकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते
error: Content is protected !!