कणकवली फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिना निमित्त जिल्हास्तरीय मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा 2 चे आयोजन

संतोष हिवाळेकर

कणकवली फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने 19 ऑगस्ट 2025 रोजी जागतिक छायाचित्र दिना निमित्त जिल्हास्तरीय मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा 2 एच पी सीएल हॉल , कणकवली कॉलेज सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत.आयोजीत करण्यात आली आहे.


स्पर्धेचा विषय आहे – आपलं कोकण

या स्पर्धेसाठी पारितोषिके पुढीलप्रमाणे


प्रथम पारितोषिक – स्मार्ट वॉच(पुरस्कृत- सन आर्ट स्टुडिओ , सांगली )/ सन्मानचिन्ह / सन्मानपत्र
द्वितीय पारितोषिक – ब्ल्यूटूथ स्पिकर बार ( पुरस्कृत – श्री. निशीकांत कडुलकर )/ सन्मानचिन्ह / सन्मानपत्र
तृतीय पारितोषिक – इयर फोन (पुरस्कृत – गुलमोहर फोटो कणकवली )/ सन्मानचिन्ह / सन्मानपत्र
उत्तेजनार्थ 1 – सन्मानचिन्ह / सन्मानपत्र
उत्तेजनार्थ 2 – सन्मानचिन्ह / सन्मानपत्र
👉🏻सहभागी प्रत्येक स्पर्धकाला सहभाग सन्मानपत्र

स्पधेचे नियम व अटी. मोबाईल ने काढलेला फोटो दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत 9890313212 या नंबर वर व्हॉट्सअप डॉक्युमेंट फॉरमॅट ने पाठवावा .तुम्ही पाठवलेला फोटो 19 ऑगस्ट रोजी आयोजित फोटो प्रदर्शनात प्रिंट स्वरुपात सहभागी करू.

  • एका स्पर्धकाला 1 फोटो साठी 100/- रुपये प्रवेश फी राहील. ( 2 फोटो करिता 200/- रुपये ) एका स्पर्धकाला दोन फोटो पाठवण्याची मर्यादा असेल.
  • स्पर्धेची फी – वरती दिलेल्या नंबरवर फोटो पाठवल्यानंतर आपल्याला जो QR Code पाठवण्यात येईल तो QR Scan करून स्पर्धेची प्रवेश फी भरावी व त्याचा screen shot त्याच नंबरवर share करावा.प्रवेश फी भरल्यानंतरच फोटो स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाईल.
  • स्पर्धेचे परीक्षण प्रदर्शना दिवशी करून विजेत्यांची नावे घोषित केली जातील.
  • फोटो ला कोणत्याही प्रकारचे एडिटिंग असू नये. स्पर्धेचे सर्व अधिकार आयोजकांजवळ राहतील.

या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर बांधुनी सहभागी व्हावे असे कणकवली फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे

error: Content is protected !!