अणस्कुरा घाटात बसचा अपघात

चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले ५० लोकांचे जीव

राजापूर: बस अपघातांचे सत्र हल्ली वाढताना दिसून येत आहे.बस अपघतांच्या या वाढत्या प्रमाणात अजून एक वृत्त समोर आलं आहे. सांगलीहून राजापूरच्या दिशेने येणाऱ्याबसला अणस्कुरा घाटात सोमवारी सकाळी १०.३०वाजता अपघात झाला आहे. हा अपघात ब्रेक निकामी झाल्यामुळे झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान यावेळी चालक एस. आर कुर्णे यांनी प्रसंगावधान राखत गाडी डोंगराच्या दिशेने घातल्याने मोठा अपघात टळला. त्यांच्या खबरदारीमुळे ५० प्रवाशांचा जीव वाचला. अन्यथा गाडी दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती.

काय आहे सविस्तर वृत्त?

बस चालक कुर्णे हे आपल्या ताब्यातील बस क्र. एम. एच. १४. बी. टी. २९७५ ही बस राजापूर सांगली बस घेवून सांगली येथुन सकाळी ६.३० वाजता रवाना झाले होते. ही बस सकाळी १०.३०वाजण्याच्या दरम्यान अणस्कुरा घाट उतरत असताना अचानक गाडीचे ब्रेक निकामी झाले. चालक कुर्णे यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी अत्यंत सावधगिरीने बस डोंगराच्या दिशेने वळवत थांबवली. त्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला. या बसमध्ये जवळपास ५० प्रवासी होते. हे सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. दरम्यान या गाडीने राजापूर पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे व पाचल तलाठी सतीश शिंदे हे देखील प्रवास करीत होते. त्यांनीही मोठ्या अपघातातून वाचल्याची प्रतिक्रिय चालक कुर्णे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.

बसचे वाढते अपघात पाहता अनेक अपघाताची करणे ही गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे,किंवा गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आणि गाडीचा ताबा सुटल्यामुळे होत असल्याचे दिसून येत आहेत. एखाद्या गाडीचे आयुर्मान हे जास्तीजास्त १० वर्ष असते मात्र एसटी महामंडळाकडे असलेल्या बस ह्या कित्तेक वर्ष जुन्या असून त्यांच्यात आता वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत.त्यामुळे सामान्य माणसांना बस ने प्रवास करणे सुद्धा धोक्याचे वाटू लागले आहे. एसटी महामंडळाला नवीन चांगल्या स्थितीतील बस पुरवाव्यात जेणेकरून अपघातचे प्रमाण कमी होईल व लालपरीचा प्रवास पुन्हा एकदा सुखकर होईल अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे.

error: Content is protected !!