कोकणात आज रेड अलर्ट

ब्युरो न्यूज: भारतीय हवामान विभाग (IMD) ने 8 जुलैसाठी महाराष्ट्रातील विविध भागांसाठी अत्यंत महत्वाची हवामानपूर्व सूचना जारी केली आहे. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.कोकणाला रेड अलर्टकोकण विभागात विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक असणार आहे. हवामान विभागाने या भागात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असून, नागरिकांनी प्रवास करताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, वाहतूक व्यवस्थेत अडथळे येऊ शकतात, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

error: Content is protected !!