राजापूर : भाजप युवा मोर्चाचे अरविंद लांजेकर यांनी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची भेट घेत मुंबई – गोवा महामार्ग, एस. टी. डेपो समोरील उड्डाणपूल यांच्यासंदर्भात चर्चा केली. याबाबत बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संबंधित मुबई – गोवा महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार, पोलिस निरीक्षक तसेच राजपुरातील आजी – माजी लोकप्रतिनिधी सर्व सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी सांगितले.