हसत हसत मांडल्या आपल्या व्यथा:पहा व्हिडिओ
ब्युरो न्यूज: वाढते एसटी अपघात आणि बस चालकांवर होणारे आरोप हे हल्ली आपण सर्वांनीच वाचले आहे.काही मद्यधुंद चालकांमुळे संपूर्ण एसटी महामंडळावर बसलेला हा ठपका जरी असला तरी सद्ध्या सोशल मीडियावर बस चालकांच्या समस्यांचा आरसा दाखवणारा एक व्हिडिओ सद्ध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यात त्याने एसटीमध्ये चढण्याच्या प्रक्रियेवरील आपली व्यथा हसत हसत मांडली आहे.
व्हिडिओ मधे काय आहे ?
व्हिडीओमध्ये एसटी केबिनमध्ये चढण्यासाठी टप्पे बनवले गेले आहेत, पण गाडीचा दरवाजा एका बाजूला आणि चढण्यासाठीचे टप्पे दुसऱ्या बाजूला असल्यामुळे, एसटी चालकाने व्हिडीओच्या माध्यमातून प्रश्न विचारला, “आता मी गाडीत चढू कसा?” त्याच्या या मजेशीर प्रश्नामुळे व्हिडीओला सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळाली आहे.एसटी ड्रायव्हरने एक गमतीशीर व्हिडीओ बनवत आपल्या समस्येला वाचा फोडली आहे, ज्यामुळे अनेकांना डोक्यावर हात मारायला लागले.
व्हिडीओमध्ये ड्रायव्हर एसटीच्या चढण्याच्या अजब परिस्थितीवर बोलतो आहे, विशेषत: शिवशाही गाड्यांबद्दल. त्याच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलीच धूम माजवली आहे. व्हिडीओ पाहून लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत, आणि अनेकांनी “हे अजब डोकं कोणाचं?” असा सवाल विचारला आहे. ड्रायव्हरने उठवलेला मुद्दा एसटी गाड्यांच्या डिझाइनमुळे प्रवाशांना होणाऱ्या समस्यांचा दर्शक आहे.













