कणकवली शहर पटवर्धन चौकात भीषण आग
आमदार नितेश राणेंची घटनास्थळी भेट
कणकवली प्रतिनिधी: ऐन लक्ष्मी पूजन च्या दिवशी कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील राजू गवाणकर यांचे कार्यालय,आर.बी बेकरी, बर्डे मेडिकलला भीषण आग लागली.पहाटे ४ वाजता ही आग लागली असून ह्या आगीत सर्व बेचिराख झाले आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कणकवली भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकानमालकांची विचारपूस केली. त्यांनी दुकानमालकांना घाबरून जाऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आवश्यक सर्व मदत केली जाईल. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
या वेळी कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राजू गवाणकर, बेकरीचे मालक, बेर्डे मेडिकलचे मालक, राजा पाटकर, जावेद शेख, अनिल पवार, लवराज झेमने, विराज भोसले, अजय गांगण, अभय राणे, इम्रान शेख आदींसह कणकवलीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पावसामुळे झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे लागली आग.
आमदार नितेश राणे म्हणाले, “दिवाळीच्या काळात पावसामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे या दुकानांना आग लागली. यामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी सकाळपासून आमचे समीर नलावडे, बंडू हर्णे, अबिद नाईक आणि आम्ही सर्वांनी आवश्यक त्या गोष्टींची मदत केली बाहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना केली जातील. दिवाळीच्या काळात दुकानदारांना झालेल्या हानीचे दुःख वाटते,” अशी प्रतिक्रिया यावेळी आ.नितेश राणे यांनी दिली













