माजी नगराध्यक्ष संजू परब यांची विशाल परबांवर बोचरी टीका
राजन तेली यांचा पराभव अटळ
सावंतवाडी प्रतिनिधी:विधानसभा निवडणूक उमेदवार विशाल परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. विशाल परब यांनी ह्या आधीही आपल्यावर असे हल्ले झाले आहेत ,दरम्यान कोणी कितीही प्रयत्न केला तरी निवडणुकीतून माघार घेणार नाही असे वक्तव्य केले आहे. विशाल परब यांच्यावर हल्ला करणारी ती व्यक्ती कोण याचा शोध लागला असून ती व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र ह्या हल्ल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. या हल्ल्याविषयी बोलताना माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणालेत की,विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला करणारी संशयित व्यक्ती नक्की कणकवलीत काम करत होती की विशाल परब यांच्या बंगल्यावर कामाला होती. यांची पोलिसांनी तपासणी करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे.
सहानुभूती मिळवून मत मिळवू नका
गाडीवर हल्ला करून घेऊन सहानभुती मिळवून मत मिळविण्याचा हा प्रकार असू शकतो, असा आरोप देखील त्यांनी यावेळी विशाल परब यांच्यावर केला आहे.ते पुढे म्हणाले ,असल्या कोणत्याही स्टंटबाजी ला इथली जनता बळी पडून मत घालणार नाहीत. तर त्यासाठी काम करावे लागते असे देखील स्पष्ट केले आहे.
राजन तेली यांचा पराभव अटळ
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, उपरकर आणि साळगावकर यांचे यापूर्वी सावंतवाडीकारानी डिपॉझिट जप्त केले आहे. त्यामुळे त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका करू नये, राजन तेली यांचा पराभव अटळ आहे. असे मत सुद्धा यावेळी संजू परब यांनी व्यक्त केले आहे.