
डॉ. बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे यांच्या वतीने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आयोजित रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा शनिवारी इन्सुली येथे आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते झाले. विशेष उपस्थिती म्हणून श्री. विशाल प्रभाकर परब, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. विजय दळवी (सहाय्यक अधीक्षक), डॉ. गिरीश उईके (सहायक विस्तार तज्ज्ञ) , डॉ. निलिमा पवार (सहायक प्राध्यापक), सौ. अपर्णा पोटफोडे ( स्पर्धे च्या जज )प्रमुख वक्ते श्री. रमेशचंद्र शृंगारे (रानभाजी अभ्यासक) तसेच पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
रानभाजी महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन व माहिती देण्यात आली. पाककला स्पर्धेत अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
रानभाजी अभ्यासक श्री. रमेशचंद्र शृंगारे यांनी रानभाज्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व विशद केले. रानभाज्या म्हणजे फक्त रानातील भाज्या नसून आपल्या घरातील आहारात महत्त्वाच्या आहेत व त्यांचे आपण जतन केले पाहिजे.
यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात रानभाज्यांचे संवर्धन, पारंपरिक ज्ञान जतन करणे आणि स्थानिक शेतकरी व महिला गटांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी उद्यानविद्या महाविद्यालय कॉलेजचे सहयोगी अधिष्ठता डॉ. विजय दळवी यांनी सर्व उपस्थित मान्यवर व महिलांचे आभार मानले. तसेच रानभाज्यांचे संवर्धन त्यांच्या औषधी गुणधर्मांवर संशोधनाची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन साहिल बाबू कोकरे, अथर्व अनंत गावकर, अभय पाटील, सुशांत जोशी, देवेन सावंत, जसवीन जैन, रौनक पंकज या विद्यार्थ्यांनी केले.




Subscribe









