देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी

कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

कुडाळ : दि. २४ जुलै २०२६ रोजी देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात इन्स्टाग्रामवरील एका अकाउंटवरून आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक भाषा वापरण्यात आल्याप्रकरणी नेरूर येथील एका मुलीविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.

यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तन्मय वालावलकर, युवासेना तालुका प्रमुख सागर वालावलकर, प्रसन्नजित दळवी,मुक्ती परब आणि वैभव पवार उपस्थित होते.

कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी तक्रारीची दखल घेत योग्य ती चौकशी करून कायद्यानुसार आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

मतभेद असू शकतात, परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लील, अपमानास्पद आणि कायद्याचे उल्लंघन करणारी भाषा कदापि स्वीकारली जाणार नाही. असे यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले.

error: Content is protected !!