कडावल उपसरपंच स्वरूप वाळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य
योगिता कानडे/कुडाळ : कडावल येथील सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या ‘महापुरुष युवा प्रतिष्ठान, कडावल’ यांच्या वतीने उद्या, बुधवार दिनांक ३ जून २०२६ रोजी कडावल उपसरपंच स्वरूप वाळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कडावल बाजारपेठ येथील महापुरुष मंदिरासमोर हे शिबिर संपन्न होणार आहे.
सध्याच्या काळात रक्ताची वाढती गरज आणि रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता, ‘एक सामाजिक बांधिलकी’ या भावनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी ९.०० वाजल्यापासून दुपारी १.०० वाजेपर्यंत रक्तदात्यांना रक्तदान करता येईल.
कडावलचे उपसरपंच श्री. स्वरूप वाळके आणिमहापुरुष युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिसरातील जास्तीत जास्त तरुण, नागरिक आणि महिलांनी या कार्यात आपले योगदान देऊन रक्तदान करावे, असे जाहीर आवाहन केले आहे.
दिनांक : बुधवार, ३ जून २०२६
वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
स्थळ : कडावल बाजारपेठ, महापुरुष मंदिरासमोर
आयोजक : महापुरुष युवा प्रतिष्ठान, कडावल
विशेष सहकार्य : या शिबिराला श्री महापुरुष देवस्थान (कडावल), लिंग रवळनाथ देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत कडावल, कडावल मैत्री कट्टा, रिक्षा युनियन कडावल, आपलं कडावल ग्रुप, रवळनाथ क्रिकेट क्लब (निरुखे), यंगस्टार (आवळेगाव), भडगाव मित्रमंडळ, आवळेगाव मित्रमंडळ, प्रशांत स्पोर्ट (आवळेगाव तर्फे वॉरियर्स, वर्दे), शिवप्रेरणा (वर्दे), जिमटाऊन फिटनेस (कडावल), चितारअळी मित्रमंडळ, स्वयंभू पांग्रड, सुर्वेवाडी मित्रमंडळ, गुरववाडी मित्रमंडळ, तावडेवाडी मित्रमंडळ आणि फ्रेंड सर्कल (डिंगस) या सर्व स्थानिक संस्था व मित्रमंडळांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान! आपले एक पाऊल कोणाचे तरी आयुष्य वाचवू शकते.” तरी उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करा.


Subscribe










