नगरसेवक विलास कुडाळकर यांची माहिती
माझा प्रभाग माझी जबाबदारी गेली कुठे ?
नगरसेवक विलास कुडाळकर यांचा सवाल
कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या शासकीय मैदानामधील दारूच्या बाटल्यांचा खच उचलून परिसरातील स्वच्छता कुडाळ नगरपंचायतीमार्फत करण्यात आली आहे. अशी माहिती गटनेता विलास कुडाळकर यांनी दिली आहे.
कुडाळ तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या शासकीय मैदानामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच तसेच काचांचा खर्च मोठ्या प्रमाणावर असल्याचे उबाठा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सांगितले होते आणि या मैदानाची स्वच्छता करण्यासाठी उपक्रम हाती घेणार असे जाहीर केले होते ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमार्फत मैदानावरील दारूच्या बाटल्या व काचा तसेच परिसर स्वच्छ करण्यात आला याबाबत स्वच्छता विभागाला तशा सूचना देण्यात आल्या होत्या त्यामुळे हा परिसर स्वच्छ करण्यात आला असे गटनेता विलास कुडाळकर यांनी सांगितले.
माझा प्रभाग माझी जबाबदारी गेली कुठे ?
याबाबत गटनेता विलास कुडाळकर यांनी सांगितले की मैदानावर असलेल्या दारूच्या बाटल्या व काचा हे योग्य नाही पण हा प्रभाग नगरसेवक मंदार शिरसाट यांचा आहे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी या मैदानाच्या स्वच्छतेकडे तसेच मैदानावर चाललेल्या गैर प्रकाराकडे लक्ष देऊन संबंधित प्रशासनाला तशा सूचना देणे गरजेचे होत्या स्वच्छता मोहीम राबवण्यापेक्षा आपली जबाबदारी समजून नगरपंचायतीकडून ही स्वच्छता करून घेणे गरजेचे होते मात्र त्यांनी स्वच्छता मोहीम राबवून आपल्या प्रभागात किती अस्वच्छता आहे हे दाखवून दिले आहे.


Subscribe










