नेरूर : रणझुंजार मित्र मंडळ नेरूर आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढवणे स्पर्धेचा शुभारंभ उत्साहात पार पडला.
यावेळी बोलताना माजी पंचायत समिती सदस्य श्री. अतुल बंगे म्हणाले की, “रुपेश पावसकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी नारळ लढवणे स्पर्धा गतवर्षी आयोजित केली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी ‘नारळ’ हीच निशाणी घेऊन मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. यावर्षी स्पर्धेचे दुसरे वर्ष असून या माध्यमातून येथील कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. श्री. पावसकर हे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्यासाठी कार्यरत असतात.”
आपल्या मनोगतात जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर म्हणाले, “माझा नेरूर गाव ही कलाकारांची भूमी असून कला-संस्कृतीचे माहेरघर आहे. अनेक दिग्गज कलाकारांमुळे नेरूर गाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. कोकणच्या दशावतार लोककलेत नेरूर गावचे फार मोठे योगदान आहे. येथील कलाकारांना व खेळाडूंना प्रकाशझोतात आणण्यासाठी मी नेहमीच सहकार्य करेन आणि सांस्कृतिक क्षेत्राला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न निरंतर राहतील.”
स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक (विजेता): मयंक राऊत (चेंदवण) — रोख रक्कम रु. ६,६६६/- व चषक (चषक कै. तारामती गोपाळ सडवेलकर यांच्या स्मरणार्थ सडवेलकर बंधूंकडून पुरस्कृत).
द्वितीय क्रमांक (उपविजेता): साईराज मांजरेकर — रोख रक्कम रु. ३,३३३/- व चषक (चषक वृशांक प्रकाश हळदणकर यांच्याकडून पुरस्कृत).
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर, पंचायत समिती सदस्या सौ. दीप्ती नाईक, माजी पंचायत समिती सदस्य श्री. अतुल बंगे, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. अशोक पावसकर, बाळा पावसकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. समीर उर्फ शंभूराज नाईक, प्रवीण नेरुरकर, राजन नेरुरकर, उमेश परब, शिवाजी नेरुरकर, सिद्धेश कलीगणं, मंगेश बांदेकर, शेखर गावडे, रामा कांबळी, विनायक मालवणकर, प्रभाकर शृंगारे, अमोल शृंगारे, किशोर पिंगुळकर, रुपेश सावंत, सुधीर नेरुरकर, कल्पेश मार्गी, हाजीम मुजावर, कृष्णा उर्फ गोट्या पाटकर आणि संतोष परब यांसह अनेक ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. सुनील करवडकर यांनी केले.


Subscribe










