जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांचे विविध स्पर्धांच्या माध्यमातून येथील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे काम निश्चितच कौतुकास्पद

माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांचे गौरवोद्गार

नेरूर चव्हाटा येथे नारळ लढवणे स्पर्धा उत्साहात संपन्न

कुडाळ : जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी सामाजिक शैक्षणिक कार्यात वाटचाल करतानाच विविध स्पर्धांच्या माध्यमातून येथील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन शिवसेना नेते,माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी नारळ लढवणे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शुक्रवारी सायंकाळी नेरूर चव्हाटा येथे केले.

रणझुंजार मित्र मंडळ नेरुर आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर आयोजित नारळ लढवणे स्पर्धेचा शुभारंभ अतुल बंगे याच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, पंचायत समिती सदस्या सौ दीप्ती नाईक, नेरुर तंटामुक्त अध्यक्ष आनंद नेरुरकर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेरुर उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, नेरुर देवस्थान कमिटी अध्यक्ष गोटु नाईक स्पर्धक ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री बंगे म्हणाले रुपेश पावसकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी नारळ लढवणे स्पर्धा गतवर्षी केली होती. यावर्षी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी नारळ हीच निशाणी घेऊन मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला होता आणि नारळ लढवणे ही दुसऱ्या वर्षी स्पर्धा त्याने आयोजित करून येथील कलाकारांना प्रोत्साहन दिलेले आहे श्री पावसकर हे नेहमी सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या दुसऱ्याला मदत करण्यासाठी निश्चितच कार्यरत असतात असे सांगितले .
श्री पावसकर म्हणाले माझा नेरूर गाव हा कलाकारांची भूमी आहे कला संस्कृतीचे माहेरघर आहे अनेक दिग्गज कलाकार यांच्यामुळे माझा नेरूर गाव सातासमुद्रापार पोचला.कोकणच्या दशावतार लोककलेत नेरूर गावचे फार मोठे योगदान आहे येथील कलाकारांना त्यांची कला प्रकाशझोतात आणण्यासाठी नेहमीच सहकार्य करेल सांस्कृतिक क्षेत्राला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी माझा निश्चितच प्रयत्न राहणार आहे असे सांगितले.

error: Content is protected !!