पावशीत ८५ दात्यांकडून उत्स्फूर्त रक्तदान

योगिता कानडे/कुडाळ : जिल्हा रक्तपेढीच्या आवाहनानुसार भर उन्हाळ्यात पावशीच्या बेलनदी ग्रुपने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. सलग १९ वर्षे हा सामाजिक उपक्रम सुरू आहे. तेथील शांतादुर्गा मंगल कार्यालयात शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तब्बल ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. पावशीचे सुपुत्र व भांडुपचे माजी आमदार रमेश कोरगावकर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजीत देसाई, नगरसेविका संध्या तेर्से, राजू राऊळ, जि. प. उपाध्यक्ष दादा साईल, जि. प. सदस्य दीपक नारकर, रुपेश कानडे, कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, अॅड. विवेक मांडकुलकर, संजय भोगटे, छोटू पारकर, बंड्या सावंत, आबा मुंज, मोहन सावंत, पं. स. सदस्या करुणा पावसकर, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, आफ्रिन करोल व अक्षता खटावकर, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रेया गवंडे, ज्योती जळवी नीलेश परब व गणेश भोगटे, शिल्पा घुर्ये, मुक्ती परब, साधना माडये, राजेश म्हाडेश्वर, सचिन काळप, राजू गवंडे, सुनील बांदेकर, गुरु गडकर, मनोज वालावलकर, योगेश तुळसकर, राजन पावसकर, पावशी सरपंच वैशाली पावसकर, रोहिणी पाटील, जयेश चिंचळकर, दिनेश वारंग, दत्ता कोरगावकर, प्रकाश कोरगावकर, अॅड. रजत चव्हाण, रुणाल कुंमार, अनिल शेलटे सर्वेश वर्दम, मयू बांदेकर, नीलेश म्हाडेश्वर, मंदार सावंत तसेच कुडाळ केमिस्ट असोसिएशनचे ‘प्रसाद तेर्से, विनय वर्दे, हरिश्चंद्र लंगवे, दीपक परब, बाबू सावंत, सचिन कांबळी, शिवराम पणदूरकर, प्रथमेश केळबाईकर, पप्पू तोरस्कर, विनायक केसरकर, बाळा केसरकर, संध्या तेर्से ,साधना माडये, आफरीन करोल, ज्योती जळवी, श्रेया गवंडे, मुक्ती परब, शिल्पा घुर्ये, वैशाली पावसकर, नयना तवटे, अक्षता खटावकर, निशिगंधा कोरगावकर, श्रीपाद तबटे व संजय कोरगावकर
नागेश कोरगावकर, सुभाष वाटवे, अभिषेक वाटवे, नागेश खोत, विजय तेंडुलकर, ब्रिजेश कोठावळे, दिनेश नाईक आदींनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या.

रक्तदाते अॅड. विवेक मांडकुलकर, अरुण घाडी, मेघनील वाटवे, गिरीश सुकी, अंजली रेडकर, सचिन वारंग, प्रकाश तामाणेकर, दीपक रांजणकर समीर लाड. आबा जुवेकर, गुरु केसरकर, सदानंद सावंत, संदीप खोत, राजेंद्र गोसावी, रवींद्र राऊळ, प्रवीण बहिरे, सचिन केरकर यांच्यासह ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

श्रीपाद उर्फ पप्या तवटे यांनी रक्तदान शिबीर घेण्याचा उद्देश विशद केला. संध्या तेर्से यांनी बेलनदी ग्रुप आणि पप्या तवटे, संजय कोरगावकर यांच्या पुढाकाराने बेलनदी ग्रुप व त्यांच्या तरुण सहकाऱ्यांतर्फे, अन्य मंडळे, मित्रपरिवार यांच्या सहकार्यान सलग १९ वर्षे रक्तदानरुपी महायज्ञ सुरू आहे हे कौतुकास्पद असल्याचे सांगून मंडळाला शुभेच्छा दिल्या. राहुल पाटणकर, मनोज वालावलकर, स्वरुप वाळके यांनी उपक्रमातील सातत्याबाबत मंडळाचे कौतुक केले.

जिल्हा रक्तपेढीतर्फे संजय कोरगावकर, श्रीपाद तवटे यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी योगेश लाड, हर्षद तेली, पपी केसरकर, गिरीधर मुंज, बाबा तेली, प्रवीण केसरकर, तुळशीदास तेली, सदा मुंज, गुरु केसरकर, साईश केसरकर, अमोल- तेली, स्वामी केसरकर, परेश केसरकर, शैलेश केसरकर, प्रशांत खोचरे, बबलू केसरकर, योगेश तेली, नागेश नार्वेकर, दिनेश मुंज, बाळा कुडतरकर, प्रसाद अंधारी मयुरेश केसरकर, सायली केसरकर, योगिता केसरकर, श्रुती केसरकर, मीरा कोरगावकर, मिथिला खाडये, मृदुला खाडये, प्राप्ती लाड, सारा केसरकर, यथार्थ तेली, समर्थ केसरकर, गणेश बांदेकर, केदार कुडतरकर, दर्श कोरगावकर आदी सदस्यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!