पाणलोट प्रकल्पाच्या निकृष्ट कामांबाबत सामाजिक कार्यकर्ते लवू कदम यांनी विचारला जाब


दोडामार्ग : तालुक्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत श्री नितीन सावंत ( प्रकल्प समन्वयक सिंधुदुर्ग ) यांना सामाजिक कार्यकर्ते लवू कदम, प्रसाद गावडे व राज केसरकर यांनी कडक शब्दात जाब विचारला. यावेळी श्री सावंत यांच्याकडून दिशाभूल करणारी माहिती मिळाली.

प्रकल्पांतर्गत दोडामार्ग तालुक्यामध्ये बऱ्याच गावांमध्ये सिमेंट नाला बांध, कंपोझिट गॅबियन बंधारे, मजगी शेततळे यासारखी मृदू व जलसंधारण ची कामे झालेली आहेत. परंतु सदरची कामे ही निकृष्ट दर्जाची आहेत. तसेच तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या जागी झालेली आहेत. बऱ्याच ठिकाणी कामे न करता कागदावरच बंधारे बांधून पैसे उकळलेले आहेत. या प्रकल्पांतर्गत दोडामार्ग तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे.

दिनांक ५ जून २०२६ रोजी श्री सावंत यांनी याबाबत सिंधुदुर्ग कार्यालयात सभा आयोजित केलेली आहे. यासाठी दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांनी ५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा पाणलोट कक्ष सिंधुदुर्ग येथे आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री लवू कदम यांनी केले आहे.

error: Content is protected !!