सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचे नाव

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी

‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नवे नाव

सावंतवाडी : कोकणातील जनतेची अनेक वर्षांची प्रलंबित आणि अत्यंत जिव्हाळ्याची मागणी अखेर राज्य सरकारने पूर्ण केली आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते दिवंगत मधु दंडवते यांच्या सन्मानार्थ सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ते ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली.

या ऐतिहासिक नामकरणाचा अधिकृत प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.

कोकण रेल्वेच्या उभारणीत आणि या भागाच्या विकासात मधु दंडवते यांचे योगदान अतुलनीय होते. त्यामुळे सावंतवाडी स्थानकाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेकडून सातत्याने होत होती. आजच्या या निर्णयामुळे कोकणवासीयांच्या या मागणीला यश आले असून, संपूर्ण जिल्ह्यातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

error: Content is protected !!