सिंधुदुर्गात भव्य मोफत ‘महा-आरोग्य तपासणी शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेकडो रुग्णांनी घेतला लाभ

पडवे (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या (एस.एस.पी.एम.) अध्यक्षा मा. सौ. निलम नारायणराव राणे वहिनीसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज, २५ मे २०२६ रोजी पडवे येथील ‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल’मध्ये भव्य मोफत ‘महा-आरोग्य तपासणी शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला सिंधुदुर्ग जिल्हा आणि परिसरातून नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

“सर्व विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून एकाच छताखाली मोफत तपासणी” या संकल्पनेवर आधारित असलेल्या या शिबिरात सकाळपासूनच रुग्णांची मोठी गर्दी दिसून आली. हॉस्पिटलच्या ओपीडी (OPD) आणि प्रतीक्षा कक्षात रुग्णांची व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आली होती.

एकाच छताखाली विविध आजारांवर मोफत उपचार

या महा-आरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांच्या आरोग्याची बारकाईने तपासणी केली. शिबिरात प्रामुख्याने खालील मोफत सेवा पुरवण्यात आल्या.

तपासण्या: सोनोग्राफी, एक्स-रे, लॅब तपासणी, २D इको आणि ई.सी.जी. (ECG).

औषधोपचार: तपासणीनंतर रुग्णांना मोफत जेनेरिक औषधांचे वाटप करण्यात आले.

तसेच कॅन्सर (कर्करोग), बालरोग, त्वचाContentरोग, नेत्ररोग, किडनी विकार, अस्थिरोग (Orthopedics), जनरल सर्जरी, दंतविद्य, कान-नाक-घसा (ENT), जनरल मेडिसिन, फिजिओथेरपी, आणि स्त्रीरोग व प्रसूती विभागातील तज्ज्ञांनी हजारो रुग्णांना मोफत सल्ला आणि उपचार दिले. फिजिओथेरपी आणि पुनर्वसन कक्षात रुग्णांना चालण्याचा सराव आणि व्यायामाचे मार्गदर्शन करताना डॉक्टर व त्यांचे सहकारी व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले.

ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत फायदेशीर ठरले. “अनेक महागड्या तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला एकाच ठिकाणी मोफत मिळाल्याने आम्हा सर्वसामान्यांना मोठा आधार मिळाला,” अशी प्रतिक्रिया शिबिरात आलेल्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मेडिकल सुप्रिटेंडन – डॉ. पोदार सर, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.वंदना गावपांडे,प्रशासकीय अधिकारी शुभम तांबे , मार्केटिंग टीम यांच्यासह एसएसपीएम मेडिकल कॉलेजचे सर्व डॉक्टर, परिचारिका, व्यवस्थापकीय कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!