महामार्गावरील झाराप ते बांदा या दरम्यान उड्डाणपुलाच्या स्वच्छतेला सुरुवात

उड्डाणपुलावर झाडी वाढल्यामुळे झाली होती दुरावस्था

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी वेधले होते पालकमंत्र्यांचे लक्ष

सिंधुदुर्ग : मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप ते बांदा या दरम्यान उड्डाणपुलांवर मोठ्या प्रमाणावर झाडी वाढल्यामुळे उड्डाणपुलांची दुरावस्था झाली होती. जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी या गोष्टीकडे पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार उड्डाणपुलांच्या साफसफाईचे काम अखेर हाती घेण्यात आले असून प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची विशेष आढावा बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, वैभववाडी सभापती बंटी रावराणे, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, बुवा संतोष कानडे, कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल, श्रीमती पूजा इंगवले, अनामिका जाधव, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते, वीज, दूरसंचार, आरोग्य व्यवस्था आणि एसटी वाहतूक यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी महामार्गावरील उड्डाणपुलांवर वाढलेल्या झाडीकडे लक्ष वेधले होते. त्यानुसार पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला आदेश देत उड्डाणपुलाच्या स्वच्छतेबाबत सूचना केल्या. आज अखेर उड्डाणपुलाच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले असून उड्डाणपुलावरील वाढलेली झाडी स्वच्छ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमधून समाधानाचे स्वर उमटत आहेत.

error: Content is protected !!