कुडाळ शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण व काळप नाका ते गुलमोहर हॉटेलपर्यंत स्वच्छता अभियान

जीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रम, नगरपंचायत कुडाळ व रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांचा संयुक्त उपक्रम

कुडाळ/ प्रतिनिधी

“शहर बदलण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते; गरज असते ती आपल्या हातांनी छोटीशी सुरुवात करण्याची!”

आज रोटरी क्लब ऑफ कुडाळ, जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम, पणदूर तसेच कुडाळ नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरात एक अत्यंत प्रेरणादायी स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

कुडाळ नवीन बस स्थानक ते हॉटेल गुलमोहर या रस्त्याच्या दोन्ही बाजूंची साफसफाई, गवत काढणे, पडलेली झाडे हटविणे, कचरा बाजूला करणे तसेच स्मशानभूमी परिसरातील संपूर्ण गवत व झाडाझुडपांची साफसफाई, पडलेली झाडे हटविणे आणि परिसर स्वच्छ करणे अशी विविध कामे दिवसभर करण्यात आली. त्याचबरोबर स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेशही देण्यात आला.

सकाळी ८.३० वाजता सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अविरत सुरू होती. पावसाची पर्वा न करता सर्वांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. विशेषतः संविता आश्रमच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत, जिद्द आणि सेवाभाव मनाला स्पर्शून जाणारा होता. स्मशानभूमी आणि संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यासाठी त्यांनी अक्षरशः आपले हात मातीमध्ये घातले आणि श्रमदानातून सेवाभावाचे एक आदर्श उदाहरण निर्माण केले.

आजच्या मोहिमेने एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली—
“आपली छोटीशी मेहनतही आपल्या शहराचा चेहरा बदलू शकते!” ❤️

या सेवाकार्यात कुडाळ रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक, सचिव रो. राकेश म्हाडदळकर, रो. राजन बोबाटे, रो. गजानन कांदळगावकर, रो रविंद्र परब कुडाळ नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विनायक राणे, विद्यमान नगरसेवक व गटनेते विलास कुडाळकर, माजी नगरसेवक सचिन काळप, शैलेश काळप, संविता आश्रमचे संचालक तसेच रोटरी क्लबचे सदस्य, आश्रमातील बांधव आणि कुडाळमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

🙏 विशेष आभार

या संपूर्ण स्वच्छता मोहिमेस कुडाळ नगरपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले. त्याबद्दल नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर शिरवळकर यांचे मनःपूर्वक आभार.

तसेच या मोहिमेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक हाताचे आणि प्रत्येक मनाचे मनःपूर्वक आभार! 🙏

🌱 स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण कार्यक्रमातील उपस्थित सेवाभावी सहकारी

संविता आश्रम – स्टाफ व बांधव

स्टाफ (पुरुष):

  1. संदीप परब सर
  2. कामत सर (काका)

स्टाफ (महिला):

  1. मयुरी लोट
  2. सुषमा अणावकर
  3. अपर्णा दळवी
  4. गौरी पाटील

स्टाफ (पुरुष):

  1. महेश लोट
  2. बांबल आंगणे
  3. जंशवत

बांधव:

  1. चिनू
  2. गणपती
  3. बंड्या
  4. संदेश
  5. मनोहर परब
  6. पूर्वा
  7. सेजल
  8. सुप्रिया

🌿 सक्षम आश्रम (किनलस)

  1. संजय कदम
  2. पवन नाईक
  3. ज्योती आंगणे
  4. सरिता
  5. चिञा
  6. लक्ष्मी
  7. राखी मेटकर

विशेष सहकार्य:
गोविंद – नाश्ता बनवणारे
साहिल चव्हाण – ड्रायव्हर
आशिष कांबळी

आजचा दिवस केवळ स्वच्छता करण्याचा नव्हता, तर माणुसकी, सेवाभाव, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा होता.

कचऱ्याने आणि गवताने व्यापलेला परिसर स्वच्छ करताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होते आणि वृक्षाचे रोपण करताना भविष्यातील हिरव्या, सुंदर कुडाळचे स्वप्न दिसत होते. 🌱

रोटरी क्लब ऑफ कुडाळ , जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमच्या आणि नगरपंचायत कुडाळ च्या या सेवाभावी उपक्रमाला मनापासून सलाम! ❤️

🌳 चला, स्वच्छ कुडाळ… सुंदर कुडाळ… हरित कुडाळ घडवूया! 🌳

“स्वच्छता ही केवळ जबाबदारी नाही, ती आपल्या शहरावरची प्रेमाची कृती आहे!” ❤️

error: Content is protected !!